कोऱ्हाटे गावाचा इतिहास १४व्या शतकापासून सुरू झाल्याचे आढळते. गावाचे मूळ पूर्वज माना जी राव कदम हे तुळजापूरहून येथे स्थायिक झाले. सुरुवातीला वस्ती गवळवाडी भागात होती; त्यानंतर सध्याच्या ठिकाणी गाव वसले..
गावातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे केंद्रस्थान आहे. या मंदिरात दोन प्राचीन मूर्ती असून त्यांना विशेष ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. या मंदिराभोवती गावातील सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने आजही साजरे केले जातात.
शिक्षणाचा प्रवास १९१२ मध्ये पहिली जिल्हा परिषद शाळा सुरू झाल्याने सुरू झाला. या शाळेमुळे गावात साक्षरतेचे प्रमाण वाढले आणि पुढील पिढ्यांना शिक्षणाची दारे खुली झाली. पुढे जनता विद्यालयाच्या स्थापनेमुळे उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय गावातच उपलब्ध झाली.
शेती क्षेत्रातील क्रांती द्राक्षबाग लागवडीमुळे झाली. पारंपरिक पिकांवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना द्राक्ष शेतीने नवीन बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या. आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. पाणी वापर संस्थांच्या स्थापनेमुळे शेती पाण्याखाली आली व टिकाऊ शेती शक्य झाली.
शेती क्षेत्रातील क्रांती द्राक्षबाग लागवडीमुळे झाली. पारंपरिक पिकांवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना द्राक्ष शेतीने नवीन बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या. आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. पाणी वापर संस्थांच्या स्थापनेमुळे शेती पाण्याखाली आली व टिकाऊ शेती शक्य झाली.
आज कोऱ्हाटे गाव शिक्षण, शेती, रोजगार आणि सामाजिक ऐक्य या क्षेत्रात नाशिक जिल्ह्यात विशेष स्थान निर्माण करून आहे. आधुनिक शेती पद्धती, शैक्षणिक सुविधा, विविध बचत गटांची कामगिरी आणि ग्रामपंचायतीची सक्रिय भूमिका यामुळे गाव प्रगतीशील, आत्मनिर्भर आणि आदर्श गावांच्या श्रेणीत उभे आहे.
जिल्हा परिषद , नाशिक मुख्यकार्यकारी अधिकारी
अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक
प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.), जिल्हा परिषद, नाशिक
उप मुख्य कार्यकारी अधिकारी, पा. व स्व. अतिरिक्त सा. प्र. वि., जिल्हा परिषद, नाशिक
मंत्री अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र
खासदार
गट विकास अधिकारी (BDO)
सहा. गट विकास अधिकारी (A.BDO)
विस्तार अधिकारी (ग्रा. पं)
विस्तार अधिकारी (ग्राप.)
विस्तार अधिकारी (ग्राप.)
सरपंच
सौ. अश्विनी शिवाजी दोडके या ग्रामपंचायत कोऱ्हाटेच्या सरपंच असून त्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत. ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छतेवर भर देणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी आहे. शासनाच्या विविध योजना व उपक्रमांचा गावात प्रभावी अंमल होऊन प्रत्येक नागरिकापर्यंत त्याचा लाभ पोहोचावा यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटांना प्रोत्साहन देणे, प्रगत शेतीला चालना देणे आणि गावात डिजिटल पद्धतीने प्रशासन राबविणे हे त्यांचे ध्येय आहे. सामाजिक ऐक्य, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग या तत्त्वांवर आधारित नेतृत्वामुळे सौ. अश्विनी शिवाजी दोडके या आज कोऱ्हाटे गावाच्या प्रगतीशील वाटचालीत मार्गदर्शक ठरत आहेत.
20/09/2025, 04:12 pm
महिला दिन हा प्रत्येक स्त्रीच्या योगदानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. समाज, कुटुंब, शिक्षण, शेती, उद्योग, राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान अनमोल आहे. आजच्या या कार्यक्रमाद्वारे आपण महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करतो आणि त्यांच्या हक्कांविषयी जनजागृती करतो.
09/09/2025, 01:15 pm
गावाच्या सर्वांगीण विकासात ग्रामस्तरीय अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. ग्रामपंचायत, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता, शेतीविकास आदी क्षेत्रात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळे गावातील विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत.
आजच्या या विशेष कार्यक्रमात त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले. प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि जनसेवेची भावना जपत आपली भूमिका बजावली आहे. या सत्कार सोहळ्यामुळे त्यांना पुढील कार्यात नवी प्रेरणा मिळणार आहे.
09/10/2024, 05:19 pm
आज दिनांक १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. सरपंच/मुख्य पाहुणे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला.
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी-कर्मचारी, शाळकरी मुले, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने वातावरण दुमदुमले व देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कविता, भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. गावाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
01/09/2025, 04:21 pm
आज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयासमोर/शाळेत आयोजित कार्यक्रमास ग्रामस्थ, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. ज्ञानेश्वरीतील ओव्या, अभंग व गीते यांचे पठण करून उपस्थितांना आध्यात्मिक ऊर्जा मिळाली. ज्ञानेश्वरांच्या विचारधारेतून समाजात प्रेम, बंधुत्व व एकात्मतेचा संदेश देण्यात आला.
विद्यार्थ्यांनी संतचरित्रावर आधारित भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनातून संतांच्या आदर्शांचा आजच्या जीवनातील महत्त्व अधोरेखित केला.
ग्रामपंचायत मार्फत पिण्याच्या पाण्याची सोय.
द्राक्षबाग लागवड, पाणी वापर संस्थाली जाते .
जिल्हा परिषद शाळा, जनता विद्यालय, अंगणवाड्या.
आरोग्य विभाग व आयुष्मान आरोग्य मंदिरण
३३/११ के.व्ही. सबस्टेशन
दक्षिणमुखी हनुमान मंदिर
बचत गट, पेसा कमिटी
नेहारी माता मंदिर हे गावाचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी चैत्र, नवरात्र तसेच इतर सण-उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. मंदिर परिसर निसर्गरम्य असून दूरदूरवरून भाविक येथे दर्शनासाठी येतात.
ग्रामस्थांच्या ऐक्याचे प्रतीक म्हणून या मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यात्रेच्या काळात गावात उत्सवाचे वातावरण निर्माण होते.
पालखेड धरण हे मातीच्या भरावाने बांधलेले असून ते कादवा नदीवर वसलेले आहे. हे धरण नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खडकसुकेणे गावाजवळ स्थित आहे.
मुख्य माहिती:
सह्याद्री फार्म्स (Sahyadri Farms) ही नाशिक, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शेतकरी उत्पादक कंपनी आहे. ही संस्था पूर्णपणे शेतकऱ्यांच्या मालकीची असून, शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उभी केलेली सहकारी शक्ती आहे.
सह्याद्री फार्म्सची वैशिष्ट्ये:
जनता विद्यालय कोराटे या शाळेची स्थापना सन 1994 मध्ये झाली. या ठिकाणी पहिल्यांदाच इयत्ता आठवीचा वर्ग चालू झाला. या विद्यालयाच्या स्थापनेसाठी मुख्य प्रेरणास ठरलेले कर्मवीर एकनाथ भाऊ जाधव आणि गावकऱ्यांच्या पुढाकाराने तसेच आर्थिक योगदानाने ही शाळा उभी राहिली.
कैलासवासी निवृत्ती हरी कदम यांनी शाळेला २० गुंठे जागा दान केली आणि गावातील सर्व नागरिकांनी एकजुटीने योगदान देऊन शाळा उभारली.
1994 मध्ये आठवी, 1995 मध्ये नववी, आणि 1996 मध्ये दहावीचा वर्ग सुरू झाला. गेल्या पाच वर्षांपासून दहावीचा निकाल 100% लागलेला आहे. शाळेने अनेक इंजिनियर्स, डॉक्टर्स, महसूल व पोलीस अधिकारी घडवले आहेत.
गावकऱ्यांनी सात लाख रुपये जमा करून अभिनव विद्यार्थ्यांसाठी मोठे शेड उभारले. आजही गावकऱ्यांचा मदतीचा ओघ सुरूच आहे.
शाळेचा परिसर निसर्गरम्य आहे. येथे सुमारे 300 झाडे आहेत. विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणासोबत वृक्ष संगोपनाचा कार्यक्रम राबवला आहे. प्रत्येक पालकाला झाडांचे पालकत्व दिलेले आहे. शाळेत हिरडा, बेहडा, आवळा, चिंच, नीम तसेच फुलझाडांची लागवड आहे.
खेळासाठी खो-खो, कबड्डी, फुटबॉल, हॉलीबॉल यांची स्वतंत्र ग्राउंड आहेत. कुस्ती स्पर्धेसाठी मॅट उपलब्ध आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय निवडही झाली आहे.
विद्यार्थी दरवर्षी विज्ञान प्रदर्शनात व इन्स्पायर अवॉर्ड उपक्रमात सहभागी होतात. गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांची विज्ञान उपकरणे जिल्हास्तरीय निवडीस पात्र ठरली आहेत.
ग्रामपंचायत कोराटे शाळेला सतत सहकार्य करते. तणनाशक, डास निर्मूलनासाठी फवारणी, विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासण्या नियमितपणे करण्यात येतात. आरोग्य विभागामार्फत रक्तगट तपासणीसुद्धा होते.
शाळेच्या यशामध्ये शालेय समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य आणि मुख्याध्यापिका श्रीमती रंजना घंगाळे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. शिस्त, गुणवत्ता आणि पारदर्शकता ही शाळेची वैशिष्ट्ये आहेत.
आमची शाळा 1 जून 1911 रोजी स्थापन झाली असून आजपर्यंत शैक्षणिक कार्याचा गौरवशाली वारसा जपत आहे. सध्या शाळेत 31 मुले व 36 मुली अशी एकूण 67 विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे.
शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था असून सर्व तंत्रस्नेही क्वालिफाईड शिक्षकवर्ग येथे कार्यरत आहे. शाळेत डिजिटल शिक्षण, तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर, दररोजच्या परिपाठात इंग्रजी संभाषण व शब्द पाठांतर, तसेच संगीतमय परिपाठ या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. विविध स्पर्धा जसे की चित्रकला, वकृत्व, रांगोळी, पाढे पाठांतर आयोजित केल्या जातात. शाळेने केंद्रस्तरीय धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक व नृत्यस्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून विशेष यश मिळवले आहे.
दरवर्षी वार्षिक समारंभ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो ज्यामध्ये पालक व ग्रामस्थ सक्रिय सहभाग घेतात. शाळेच्या विविध उपक्रमांना ग्रामस्थांचे प्रोत्साहन मिळते. त्यामुळे शाळा आणि गाव यांच्यात घट्ट नाते निर्माण झाले आहे.
शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा या संकल्पनेवर आधारित असून परिसर स्वच्छ, आकर्षक व हिरवागार ठेवला जातो. झाडे लावा – झाडे जगवा या उपक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनावर भर दिला जातो. तसेच विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीकरिता डंबेल्स व लेझीम पथक कार्यरत आहे.
स्वच्छ शाळा सुंदर शाळा, डिजिटल शिक्षण, तंत्रज्ञानावर आधारित अध्यापन, वार्षिक समारंभ, संगीत व इंग्रजी संभाषण परिपाठ, विविध शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धा (चित्रकला, वकृत्व, रांगोळी, पाढे पाठांतर इ.), केंद्रस्तरीय स्पर्धांमधील यश, झाडे लावा–झाडे जगवा अभियान, तसेच डंबेल्स व लेझीम पथकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास.
आपल्या आरोग्य विभागाची स्थापना ............... या दिवशी झाली. येथे ग्रामस्थांसाठी विविध आरोग्य सेवा पुरवल्या जातात.
लसीकरण, गरोदर मातांचे लसीकरण, बालकांचे मासिक लसीकरण यांसह ग्रामस्थांना बीपी, शुगर, मलेरिया, क्षयरोग, कुष्ठरोग व इतर आजारांवर मोफत उपचार दिले जातात.
आपल्या आरोग्य विभागाला टी.बी. मुक्त पुरस्कार जिल्हा स्तरावरून प्राप्त झाला आहे. हा आपल्या कार्याचा मोठा सन्मान आहे.
गावातील शाळा तपासणी, अंगणवाडी तपासणी, गरोदर मातांची तपासणी व इतर आरोग्य विषयक उपक्रम आपल्या विभागाच्या मार्फत केले जातात.
आरोग्य विषयक जनजागृतीद्वारे कुटुंबकल्याण शस्रक्रिया प्रवृत्त करणे, गरोदर मातांना आहारविषयक सल्ला, बालकांचा आहार व तपासणी मार्फत कुपोषण कमी करण्यासाठी सातत्याने काम केले जाते.
आपल्या आरोग्य विभागामार्फत सिकलसेल तपासणी नियमितपणे केली जाते. या तपासण्या ग्रामस्थांच्या आरोग्य सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरतात.
आपल्या सबस्टेशनची स्थापना दिनांक १३/०९/२०१७ रोजी मा.श्री. गिरीश महाजन साहेब आणि मा.श्री. बावनकुळे उर्जामंत्री साहेब यांच्या हस्ते करण्यात आली.
सबस्टेशन मध्ये १० एम.व्ही.ए. चा एक ट्रान्सफार्मर असून आता नवीन ५ एम.व्ही.ए. चा ट्रान्सफार्मर बसविण्यात आला आहे. एकूण ७ फिडर काढण्यात आले असून येणारी ३३ केव्ही लाईन ही दिंडोरी १३२ सबस्टेशन येथून येते.
कोऱ्हाटे सबस्टेशन वरून पालखेड MIDC, पालखेड शिवार आणि पालखेड गाव येथे फीडर्स जातात. तसेच कोऱ्हाटे गावासाठी – गावठाण, कोऱ्हाटे शिवार लाईन व आक्राळे गावासाठी फीडर्स आहेत. खास गावासाठी दोन ट्रान्सफार्मर बसवले आहेत – एक गावासाठी व एक बरडवस्ती साठी. शिवारात शेतकऱ्यांसाठी ३२ ट्रान्सफार्मर आहेत.
गावामध्ये २ कोल्ड स्टोरेज आहेत. त्यांना येणारा सप्लाय मोहाडी सबस्टेशन येथून MGP फीडरवरून पुरविला जातो.
१४ व्या शतकाच्या उत्तरार्धात पूर्वज माना जी राव कदम तुळजापूरहून जुना मारुती येथे आले व गवळी वस्ती करून राहू लागले. नंतर शिंदे कुटुंब कोकमठाण येथून येथे आले. लोकसंख्या वाढल्याने वस्ती सध्याच्या कोऱ्हाटे गावात स्थायिक झाली.
गावात दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे ज्यामध्ये दोन सुंदर मूर्ती आहेत. जुना मारुती येथील मूर्ती सध्याच्या मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात आली असल्याचे सांगितले जाते. कदम आडनाव आधी “मोकाट”, आणि शिंदे आडनाव आधी “डोखळे” होते.
शनिमंदिराची स्थापना देवराम बाबा शिंदे यांच्या वडिलांनी स्वखर्चाने केली. अक्षय तृतीयेला शनी महाराजाची यात्रा भरते. रथाला प्रत्येक घरातील बैल मान म्हणून जोडले जातात.
१९१२ मध्ये जिल्हा परिषद शाळा चौथीपर्यंत सुरु झाली. १९३० पासून अखंड हरिनाम सप्ताह चैत्र शुद्ध पंचमीला सुरु झाला असून आजही चालू आहे.
खंडेराव मंदिराची स्थापना ग्रामस्थांनी केली. १९९० पासून मार्गशीर्ष दशमीला खंडेराव महाराजाची यात्रा भरते. बारा गाडा ओढण्याचा मान गावातील प्रमुख व्यक्तींना दिला जातो.
१९८२ पूर्वी सिंचनाची सोय नव्हती त्यामुळे गाव दुष्काळी होते. १९८६ पासून शेतकरी द्राक्षबागेची लागवड करू लागले ज्यामुळे आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली.
सह्याद्री प्रोड्युसर फार्म्स कंपनीमुळे शेतीमाल विक्री व रोजगार उपलब्ध झाला. पाझर तलाव (१९६४) आणि रोजगार हमी योजनेंतर्गत दुसरा तलाव (१९७२) तयार करण्यात आला.
ग्रामपंचायतीच्या निधीतून कंपाउंड, दशक्रिया विधी शेड, विहीर व जलजीवन मिशन अंतर्गत टाकी बांधण्यात आली. गावामध्ये दोन स्मशानभूमी आहेत व त्यांचे सुशोभीकरण झाले आहे.
जय जनार्दन स्वामी मंडळ, निवृत्ती भजनी मंडळ यांच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रम होतात. वाघाड धरण उजव्या कालव्यावर पाणी वापर संघ स्थापन झाल्याने शेती पूर्ण पाण्याखाली आहे.