Visitors: 477
📢 ठळक सूचना: ग्रामपंचायत कोऱ्हाटेत स्वच्छता अभियान राबविण्यात येणार – गावातील प्रमुख रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता मोहिम.
...

10-09-2025 , 05:22 PM

वॉटर एटीएम शुभारंभ

आज ग्रामपंचायत कोऱ्हाटे येथे स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएम मशीनचा शुभारंभ करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन होऊन ग्रामस्थांना सुरक्षित व स्वच्छ पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या उपक्रमामुळे गावातील नागरिकांना कमी दरात, सुलभ व स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे. आरोग्यदायी जीवनशैलीसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, महिला बचत गट व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

...

09-09-2025 , 05:23 PM

विहिरीला सोलर शुभारंभ करतांना

आज ग्रामपंचायत कोऱ्हाटे येथे शेतीसाठी पाणीपुरवठा सुलभ करण्याच्या उद्देशाने विहिरीस सोलर पंप प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून या योजनेला सुरुवात झाली.

सौरऊर्जेच्या माध्यमातून चालणारी ही यंत्रणा शेतकऱ्यांना अखंडित पाणीपुरवठा करणार असून वीज बचत व पर्यावरण संरक्षणासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या वेळी ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...

17-09-2025 , 09:26 PM

घरकुल योजना मार्गदर्शन

घरकुल योजना ही गरजू व अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना स्वतःचे पक्के घर मिळावे यासाठी शासनाने राबवलेली महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेत पात्र लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी आर्थिक अनुदान तसेच तांत्रिक मार्गदर्शन दिले जाते.